मुंबई | प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिला क्रिकेट विश्वचषक 2025 साठीच्या बक्षीस रकमेची घोषणा केली असून, यंदा तब्बल 122.5 कोटी रुपयांची एकूण रक्कम खेळाडूंमध्ये वाटली जाणार आहे. प्रत्येक संघाला सहभागी होण्यासाठी 2.20 कोटी रुपये मिळणार आहेत.
महिला क्रिकेटमध्ये हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक टप्पा मानला जात आहे. पुरुषांच्या क्रिकेटइतकाच महिलांच्या स्पर्धेलाही मानाचा तितकाच ताज मिळावा, यासाठी आयसीसीने ही पावले उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
क्रिकेट जाणकारांच्या मते, एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षीस रक्कम उपलब्ध झाल्याने महिला क्रिकेट अधिक आकर्षक होईल आणि खेळाडूंचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
बक्षीस रकमेचे वाटप असे:
- विजेता संघाला 40 कोटी रुपये
- उपविजेता संघाला 20 कोटी रुपये
- सेमीफायनलिस्ट संघाला प्रत्येकी 9.88 कोटी रुपये
- गट स्तरावरील प्रत्येक विजेत्या संघाला 30 लाख रुपये
- पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहणाऱ्या संघांना प्रत्येकी 6 कोटी रुपये
- सातव्या आणि आठव्या क्रमांकावर राहणाऱ्या संघांना प्रत्येकी 2.47 कोटी रुपये