आयुष कोमकर गँगवॉरचा बळी. पुण्यात आंदेकर–कोमकर वाद पेटला.

पुणे | प्रतिनिधी

शहरातील नाना पेठ परिसर पुन्हा एकदा गँगवॉरच्या थराराने हादरला आहे. अलीकडेच आयुष गणेेश उर्फ गोविंद कोमकर (वय 19) याचा निर्घृण खून करण्यात आला. आंदेकर टोळीच्या गुंडांनी धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात आयुषचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे आंदेकर–कोमकर गँगवॉर पुन्हा पेटला आहे.

आंदेकर–कोमकर वैराची मोठी पार्श्वभूमी आहे.सुमारे वर्षभरापूर्वी 1 सप्टेंबर 2024 रोजी माजी नगरसेवक वानराज आंदेकर यांची नाना पेठेत दिनदहाड्या हत्या झाली होती. या प्रकरणी कोमकर कुटुंबासह काही जणांना आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. आंदेकर समर्थकांनी तेव्हापासूनच प्रतिशोधाची भाषा केली होती. अगदी वानराज आंदेकर यांच्या अंत्यविधीला त्यांच्या समर्थकांनी शस्त्रपूजन करून “बदला घेऊ” अशी शपथ घेतल्याचे वृत्त आहे.

प्रतिशोधाची कारवाई;  आयुषवर हल्ला याच वैरातून आयुष कोमकरला लक्ष्य करण्यात आले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास आयुष आपल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये असताना आंदेकर टोळीतील 10-12 जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. तलवारी, कोयते यांसारख्या धारदार हत्यारांनी वार करून त्याचा खून करण्यात आला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या आयुषला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोवर त्याचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शहरात तातडीने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. भविष्यातील तणाव टाळण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे.

या घटनेमुळे पुणेकर पुन्हा धास्तावले आहेत. सलग घडणाऱ्या गँगवॉरमुळे मध्य पुण्यातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. आंदेकर–कोमकर यांच्यातील जुना वैर पुन्हा तीव्र झाल्याने आणखी खून-हल्ल्यांची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!