सी. पी. राधाकृष्णन १५ वे उपराष्ट्रपती माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव

नवी दिल्ली | प्रतिनिधी

भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. राधाकृष्णन यांनी ४५२ मतं मिळवत १५२ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांच्या मतांवर आधारित या निवडणुकीची प्रक्रिया सकाळी दहापासून संध्याकाळपर्यंत पार पडली. निकाल जाहीर होताच संसदेच्या परिसरात एनडीए खासदारांनी जल्लोष केला.

६७ वर्षीय राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास तामिळनाडूतून सुरू झाला. ते दोनदा कोयंबतूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले असून तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. गेल्या वर्षी त्यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती.

उपराष्ट्रपती पदावरून सभागृहाचे (राज्यसभा) अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळण्याची परंपरा आहे. त्यामुळे राधाकृष्णन यांच्या कार्यकाळात संसद चालवण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाची भूमिका बजावतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!