आज भारत-पाकिस्तान लढत; जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष.

आज भारत-पाकिस्तान लढत.आशिया कप २०२५ मधील सर्वात प्रतिक्षित सामना आज दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. सायंकाळी ६:३० वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होणाऱ्या या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमी डोळे लावून बसले आहेत.

भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत असून, उपकर्णधार शुभमन गिलसह संघात हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानकडून सलमान अली आघा कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत असून, फखर झमान, साइम अय्यूब आणि हारिस रऊफ यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताने UAE ला पराभूत केले तर पाकिस्तानने ओमानवर मात केली. त्यामुळे आजचा सामना सुपर-४ मध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

दरम्यान, भारतात या सामन्याला विरोधाचे सूर उमटले आहेत. अलीकडच्या ‘पैलगाम’ दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतरच्या “ऑपरेशन सिंदूर” मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संघटना व काही राजकीय नेत्यांनी भारत-पाकिस्तान सामन्याचा बहिष्कार करण्याची मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टातही तातडीची याचिका दाखल करण्यात आली होती; मात्र न्यायालयाने सामन्याला थांबवण्यास नकार देत खेळ चालू राहणार असल्याचे स्पष्ट केले.

भारत-पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक प्रतिस्पर्धीपणामुळे हा सामना केवळ क्रिकेटपुरता मर्यादित न राहता, प्रतिष्ठेची लढत आहे. सामना Sony Sports Network व SonyLIV अॅपवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.

भारताचा संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रिंकू सिंग.

पाकिस्तानचा संघ :

सलमान अली आघा (कर्णधार), फखर झमान, हसन नवाज, साहिबजादा फर्हान, साइम अय्यूब, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, हुसेन तलत, खुशदिल शाह, अबरार अहमद, हारिस रऊफ, हसन अली, मोहम्मद वसीम जूनियर, सलमान मिर्झा, सुुफियान मुक्किम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!