अहिल्यानगर |प्रतिनिधी
खासदार निलेशजी लंके यांचा जनता दरबार.
नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत “जनता दरबार” उद्या, मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता नेता सुभाष चौक, चितळे रोड येथील मा.आमदार अनिलभैय्या राठोड यांच्या शिवालय कार्यालयात होणार आहे.
नागरिकांच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांसाठी हे व्यासपीठ खुले असून, तक्रारी व अडचणी थेट खासदारांकडे मांडण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. शिवसेना युवासेनेचे विक्रम अनिलभैय्या राठोड यांच्या पुढाकाराने हा दरबार घेण्यात येत आहे.
जनता दरबारामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक यासह दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपापल्या समस्या मांडण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.