अहिल्यानगरमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

अहिल्यानगर | प्रतिनिधी

पुढील तीन ते चार तासांत जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील नगर शहरासह ग्रामीण भागात वातावरण ढगाळ असून काही ठिकाणी हलका पाऊस सुरू झाला आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, तसेच सुरक्षित ठिकाणी राहावे, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.

अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाट यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी शेती कामकाज तसेच मोकळ्या जागेत जाणे टाळावे. वीज पडण्याच्या घटना टाळण्यासाठी झाडांच्या सावलीखाली उभे राहू नये, मोबाईलचा वापर कमी करावा आणि घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरक्षित ठेवावीत, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!