अहिल्यानगर | २१ सप्टेंबर
हिंदू पंचांगानुसार आजचा दिवस विशेष मानला जात आहे. कारण आज सर्वपित्री अमावस्या असून याच दिवशी अमला योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांचा संयोग झाला आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्वपित्री अमावस्या पाळली जाते आणि या दिवशी आपल्या पूर्वजांना तर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्याची परंपरा आहे.
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, अमला योग व सर्वार्थ सिद्धी योग हे दोन्हीही शुभ योग मानले जातात. या योगांत केलेले धार्मिक विधी, दानधर्म आणि जप-तप अधिक फलदायी ठरतात. त्यामुळे आजचा दिवस पूर्वजांना स्मरण करण्यासोबतच, धार्मिक कार्यांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे.
तसेच आज राहुकाल संध्याकाळी ४.३० ते ६.०० या वेळेत असेल, त्यामुळे या काळात कोणतेही नवीन कार्य टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.