उत्कृष्ट शिक्षकांच्या कार्याचा गौरव – प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

अहिल्यानगर | प्रतिनिधी

सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय व हक्क परिषद (अभियान), अहिल्यानगर यांच्या वतीने “शैक्षणिक लघुपट प्रदर्शन व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व पुरस्कार वितरण सोहळा” दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६ ते ९ वाजता माऊली सभागृह, झोपटी कॅन्टीनजवळ, सावेडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री मा. पोपटराव पवार (आदर्शगाव हिवरे बाजारचे प्रणेते)मा. डॉ. सर्जेराव निमसे (माजी कुलगुरू, नांदेड व लखनौ विद्यापीठ) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच समाजकार्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुक शिक्षकांनी किंवा संस्थांनी आपल्या कार्याचा संक्षिप्त तपशील, योगदानाची माहिती आणि शिफारसपत्रासह प्रस्ताव सादर करावेत.

मुख्य संयोजक सुदाम लगड यांनी सांगितले की, “या उपक्रमाचा उद्देश म्हणजे शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजात आदर व प्रतिष्ठा मिळवून देणे.” तसेच शैक्षणिक लघुपटांमधून शिक्षण व्यवस्थेतील आव्हाने व शक्यता अधोरेखित केल्या जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

अधिक माहितीसाठी किंवा प्रस्ताव सादर करण्यासाठी इच्छुकांनी 8805643333 / 8857089557 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
संपर्काचा पत्ता : शिवांजली मंगल कार्यालय शेजारी, भुषण नगर, केडगांव, अहिल्यानगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!