दादा भुसे यांचे शहरात स्वागत; महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना सज्ज

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आज शहरात आले असता त्यांचे (शिंदे गट) शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. या वेळी कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसे यांनी पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांसोबत बैठक घेऊन पक्ष मोर्चेबांधणीचा कानमंत्र दिला.

भुसे म्हणाले, “शिवसेना (शिंदे गट) ही केवळ पक्ष नाही, तर जनतेचा विश्‍वास आहे. नगरकरांनी शिवसेनेवर  (शिंदे गट) दाखवलेल्या विश्वासाचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा(शिंदे गट)  महापौर नगरकरांच्या आशीर्वादाने विराजमान होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीत जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी सांगितले की, “कार्यकर्ते सध्या घराघरांत जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत. महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जनसेवाभिमुख कार्य हेच आमचे ब्रीद असून, आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद सर्वांसमोर येईल,” असे ते म्हणाले.

स्वागत सोहळ्यात शहर प्रमुख सचिन जाधव, दिलीप सातपुते, संभाजी कदम, दीपक खैरे, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, दत्ता जाधव, संग्राम कोतकर, विजय पठारे, प्रशांत गायकवाड, दत्ता कावरे, पारुनाथ ढोकळे, आशिष शिंदे, सचिन लोखंडे, ओंकार शिंदे, शुभम कावळे, अक्षय कोंडवार, प्रथमेश भापकर, शुभम चिपाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भुसे यांच्या या भेटीत निवडणुकीतील प्रचार, जनसंपर्क आणि विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून रणनीती ठरवण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!