अहिल्यानगर | प्रतिनिधी
राज्यातील महापालिका निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आता कमी होताना दिसत आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादी दुरुस्तीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार महापालिका निवडणुकीची प्रक्रिया आता १२ डिसेंबरऐवजी २२ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे निवडणुका डिसेंबरमध्ये घेणे जवळजवळ अशक्य झाले आहे.
त्याचबरोबर, या निवडणुकांतील आरक्षणाबाबतचा महत्त्वाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला होणार असून, त्यात न्यायालय कोणता निर्णय देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ओबीसी आरक्षण आणि महिलांसाठी राखीव जागांचे विभाजन कसे राहणार, हा निवडणुकीच्या तारखांइतकाच महत्त्वाचा मुद्दा आहे.
निवडणूक तज्ञांच्या मते, सुधारित मतदारयादी आणि आरक्षणावरील न्यायालयीन निर्णय मिळेपर्यंत आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार नाही. त्यामुळे निवडणूक आता डिसेंबरऐवजी जानेवारीत किंवा त्यानंतर होण्याची शक्यता जास्त आहे.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com