बोल्हेगावात राजकीय धक्का; माजी सभागृह नेते अशोक बडे यांची निवडणुकीतून अचानक माघार

अहिल्यानगर | २९ नोव्हेंबर

प्रभागातील विकास कामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्योजक बाबुशेठ नागरगोजे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आली. या बैठकीत प्रभागातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा संकल्प व्यक्त केला.

बैठकीत बोलताना नागरगोजे म्हणाले, “शिवसेनेबाबत कोणतीही नाराजी नाही. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील विकासकामे दमदार झाली. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी पुढे स्व. अरुणकाका जगताप यांच्याशी असलेल्या कौटुंबिक स्नेह संबंधांचा उल्लेख करत, आगामी काळात बोल्हेगाव–नागापूर परिसरातील सर्व विकास प्रश्नांवर ठामपणे काम करण्याचा संकल्प जाहीर केला.

बैठकीत उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी सभागृह नेते अशोक बडे, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, बबन कातोरे, भाऊसाहेब भोर, लहानू भोर, नवनाथ कातोरे, चेअरमन बाळासाहेब वाकळे, बहिरू वाकळे, अनिल नागरगोजे, भाऊसाहेब खेडकर, चैतन्य बडे, बाळासाहेब बडे, केशव नागरगोजे, सुनील खामनेकर, आप्पासाहेब कातोरे यांसह बोल्हेगाव–नागापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुमारसिंह वाकळे यांनी सांगितले की, “प्रभागाच्या विकासासाठी आपण एकत्र आलो आहोत. आता मित्रपरिवारात कोणताही मतभेद राहिलेला नाही. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत चारही उमेदवार ‘घड्याळ’ चिन्हावर विजय मिळवतील,” असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, माजी सभागृह नेते अशोक बडे यांनी महापालिका निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी गेल्या २० वर्षांच्या कार्याचा उल्लेख करत नागरगोजे–बडे कुटुंबाने सामाजिक कार्यातून नागरिकांशी घट्ट नाते जोडल्याचे सांगितले.

बाबुशेठ नागरगोजे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश हा केवळ राजकीय निर्णय नसून, प्रभागाच्या शाश्वत विकासासाठी घेतलेला निर्णय आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आपले प्रश्न सुटतील यावर पूर्ण विश्वास आहे,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब खेडकर यांनी केले तर चैतन्य बडे यांनी आभार मानले.

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!