अहिल्यानगर | 9 डिसेंबर 2025
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड थंडी वाढली असून अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सियसपेक्षा खाली गेले आहे. भारतीय हवामान खात्याच्या नोंदींनुसार तापमानात ही घसरण स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे हवामान खात्याने 9 ते 11 डिसेंबर या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
जिल्ह्यात रात्री आणि पहाटे विशेषत: गारठा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ग्रामीण भागात तर शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याची वेळ आली आहे. हवामान विभागाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले असून सकाळ-संध्याकाळ बाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करण्यास सांगितले आहे.
जिल्ह्यात पुढील तीन दिवस तीव्र थंडीचा “लाट” येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
“जिल्ह्यात किमान तापमान 10 अंशांखाली गेले असून पुढील काही दिवस गारठा वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी.”
— भारतीय हवामान खाते
नविन बातम्यांसाठी 👉