अबूधाबी| प्रतिनिधी
IPL 2026 साठी काल अबू धाबी येथे पार पडलेल्या मिनी ऑक्शनमध्ये अनेक मोठे निर्णय पाहायला मिळाले. लिलावाची सुरुवात संथ झाली असली, तरी कॅमरुन ग्रीनचे नाव येताच स्पर्धा चांगलीच रंगली. कोलकाता नाइट रायडर्सने ग्रीनसाठी तब्बल 25.20 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.
या मिनी ऑक्शनमध्ये काही खेळाडू अनसोल्ड राहिले, तर अनेक खेळाडूंवर अपेक्षेपेक्षा मोठ्या बोली लागल्या. काही संघांनी थेट लिलावाऐवजी ट्रेडच्या माध्यमातून संघबांधणी पूर्ण केली. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेविड मिलर हा लिलावातील पहिला विकला गेलेला खेळाडू ठरला.
कालच्या लिलावानंतर बहुतांश संघांची 2026 साठीची टीम जवळपास निश्चित झाली असून, पुढील हंगामासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.
🟡 संघनिहाय खरेदी आणि रिटेन खेळाडू
🔶 चेन्नई सुपर किंग्स
विकत घेतलेला खेळाडू:
अकील होसैन – 2 कोटी
रिटेन/ट्रेड:
एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस, नूर अहमद, संजू सॅमसन (ट्रेड) यांच्यासह एकूण मजबूत संघ कायम
🔷 दिल्ली कॅपिटल्स
विकत घेतलेले खेळाडू:
डेविड मिलर – 2 कोटी
बेन डकेट – 2 कोटी
रिटेन/ट्रेड:
अक्षर पटेल, कुलदीप यादव, केएल राहुल, मिचेल स्टार्क, नितीश राणा (ट्रेड)
🔶 गुजरात टायटन्स
रिटेन:
शुभमन गिल, राशिद खान, जोस बटलर, मोहम्मद सिराज, कगिसो रबाडा यांच्यासह संघ कायम
🟣 कोलकाता नाइट राइडर्स
विकत घेतलेले खेळाडू:
कॅमरुन ग्रीन – 25.20 कोटी
मतीषा पतिराना – 18 कोटी
फिन ऐलन – 2 कोटी
रिटेन:
सुनील नरेन, रिंकू सिंह, वरुण चक्रवर्ती
🔷 लखनऊ सुपर जायंट्स
विकत घेतलेले खेळाडू:
वानिंदू हसरंगा – 2 कोटी
एनरिक नॉर्खिया – 2 कोटी
रिटेन/ट्रेड:
ऋषभ पंत, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, अर्जुन तेंडुलकर (ट्रेड)
🔵 मुंबई इंडियन्स
विकत घेतलेला खेळाडू:
क्विंटन डिकॉक – 1 कोटी
रिटेन/ट्रेड:
रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव
🔴 पंजाब किंग्स
रिटेन:
श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग, मार्कस स्टोइनिस, युजवेंद्र चहल यांच्यासह संघ कायम
🟡 राजस्थान रॉयल्स
विकत घेतलेला खेळाडू:
रवी बिश्नोई – 7.20 कोटी
रिटेन/ट्रेड:
यशस्वी जायसवाल, जोफ्रा आर्चर, रवींद्र जडेजा, सॅम करन (ट्रेड)
🔴 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
विकत घेतलेले खेळाडू:
वेंकटेश अय्यर – 7 कोटी
जॅकब डफी – 2 कोटी
रिटेन:
वि
राट कोहली, फिल सॉल्ट, जॉश हेजलवुड
🟠 सनरायजर्स हैदराबाद
रिटेन:
पॅट कमिन्स, ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com