प्रभाग ८ मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मीना देठे मैदानात

अहिल्यानगर | ३० डिसेंबर २०२५

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी शहरातील सर्वच प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला होता. विविध पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ (अनुसूचित जाती प्रवर्ग) मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाकडून मीना संजय देठे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत शुभम देठे आणि सनी देठे हे सूचक व अनुमोदक म्हणून उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर बोलताना मीना देठे म्हणाल्या की, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो कधीही तडा जाऊ देणार नाही. प्रभागातील अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असून, येत्या काळात त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा माझा निर्धार आहे.”

प्रभागातील मूलभूत सुविधा, नागरी समस्या आणि विकासकामे यांना प्राधान्य देऊन काम करण्यासाठीच आपण निवडणूक रिंगणात उतरल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!