कुमारसिंह वाकळे बिनविरोध ; प्रभाग ८ मध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष

अहिल्यानगर | १ जानेवारी २०२६

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपल्यानंतर काल अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडली. सकाळपासून विविध प्रभागांमध्ये अर्जांवरील हरकती, आक्षेप आणि त्यावर सुनावण्या सुरू होत्या. काही प्रभागांमध्ये चुरशीचे वातावरण पाहायला मिळाले.

दरम्यान, प्रभाग क्रमांक ८ मधील “ड – सर्वसाधारण” प्रवर्गात मोठी राजकीय घडामोड घडली. अर्ज छाननीनंतर या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार कुमारसिंह बबनराव वाकळे आणि अपक्ष उमेदवार कोलते पोपट मुरलीधर यांचे अर्ज वैध ठरले होते.

मात्र आज सकाळी अपक्ष उमेदवार कोलते पोपट मुरलीधर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या प्रभागात केवळ एकच उमेदवार शिल्लक राहिला. परिणामी, कुमारसिंह वाकळे हे प्रभाग क्रमांक ८ मधून बिनविरोध निवडून आले आहेत.

या बिनविरोध निवडीमुळे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते उघडले असून, पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!