अहिल्यानगर | ४ जानेवारी
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे चित्र दिसत असून, प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने झंझावाती प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. सुडके मळ्यातील गणेश मंदिरात नारळ वाढवून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी अधिकृत प्रचाराला सुरुवात केली.
यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सारिका हनुमंत भुतकर, गोरख अर्जुन बोरुडे आणि धनंजय पोपट गोलवड उपस्थित होते. त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने समर्थक, महिला, युवक आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी तिन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली.
प्रचारादरम्यान उमेदवारांनी सुडके मळा, बोरुडे मळा, भुतकरवाडी, बालिकाश्रम रोड परिसरात घराघरात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रचार फेरीत महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी होती, तर युवकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
काही ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे औक्षण केले, तर अनेक ठिकाणी आपुलकीने विचारपूस करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उमेदवारांनी येत्या काळात प्रभागाच्या विकासासाठी आपली भूमिका काय असणार आहे, हे थेट मतदारांशी संवाद साधत स्पष्ट केले.
यावेळी माजी विरोधी पक्षनेते बहिरनाथ तुकाराम वाकळे यांनी महत्त्वपूर्ण आरोप करत आपली भूमिका मांडली. अलीकडच्या काळात महानगरपालिकेने घरपट्टी आणि नळपट्टी मोठ्या प्रमाणात वाढवली असून, यामागचे कारण माजी खासदार सुजय विखे यांच्या विळद घाट येथील हॉस्पिटल व कॉलेजेसना दिलेल्या करवाढीतील सवलती असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाच्या नगरसेवकांच्या मदतीने ही सवलत देण्यात आली असून, त्याचा बोजा आता सामान्य नागरिकांकडून वसूल केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, प्रभागात दिवंगत आमदार अनिल भैय्या राठोड यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आज धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याकडे असून, प्रचारादरम्यान नागरिकांकडून अनिल भैय्या राठोड यांच्या आठवणी काढल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रचाराच्या प्रारंभी शंकरराव सुडके, प्रकाश बोरुडे, मंजन सुडके, नंदकुमार सुडके, दीपक सुडके, रावसाहेब सुडके, गोरख तुकाराम बोरुडे, बाळासाहेब बोरुडे, अमोल बोरुडे, जालिंदर बोरुडे, किरण बोरुडे, अतुल राऊत, बाळासाहेब भुतकर, गणेश शिंदे, छबुराव वाकळे, लक्ष्मण शिंदे, मच्छिंद्र फुलसौंदर, शरद बोरुडे, संदीप बोरुडे,वैभवने नेमाने वैशाली तोडमल उज्वला वाकळे समृद्धी वाकळे भूमिका थोरवे वर्षा थोरवे सूर्यभान गोलवड पोपट गोलवड अरुण गोलवड सुभाष गोलवड विजय गुंजाळ अशोक बर्डे रवी गोलवड कैलास गोलवड करण गुंजाळ सागर अहिरे गोरख बनकर लिलाबाई माळी संगीता गोलवड भारती पवार सविता बर्डे मनीषा माळी सुमन पवार मंगल गुंजाळ तसेच अनेक महिला-पुरुष कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com