अहिल्यानगर | 12 जानेवारी 2026
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार झंझावाती प्रचार दौरे करत प्रभागनिहाय मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित एका सभेत माजी खासदार सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर थेट निशाणा साधला.
सभेत सुमारे 40 मिनिटे बोलताना सुजय विखे यांनी मागील दीड वर्षांचा कार्यकाळाचा दाखला देत खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली. “दीड वर्षात तुम्ही निवडून दिलेला खासदार एक रुपयाचंही काम दाखवू शकत नाही,” असे म्हणत विखे यांनी लंके यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महानगरपालिका निवडणूक तोंडावर असताना अशा थेट आरोपांमुळे राजकीय वातावरण अधिकच चुरशीचे झाले असून, येत्या काळात प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांची धार आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदारही या आरोपांना किती महत्त्व देतात, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com