अहिल्यानगर जिल्हा प्रमुख तथा अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीतील शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार अनिल शिंदे यांना आज सायंकाळी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सायंकाळच्या सुमारास अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या डॉक्टरांकडून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असून, प्रकृतीवर वैद्यकीय पथकाचे बारकाईने निरीक्षण आहे.
अनिल शिंदे हे सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होते. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. पुढील उपचार आणि प्रकृतीविषयी अधिकृत माहिती डॉक्टरांकडून अपेक्षित आहे.