अहिल्यानगर| प्रतिनिधी
येथील बोल्हेगाव नागापूर प्रभाग क्र. 7 मधील म्हसोबा चौक, प्रेमभारती नगर परिसर ते जय भवानी चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम आमदार मा. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनातून व मा. नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रगतिपथावर आहे.
बोल्हेगाव येथील प्रेमभारती नगर परिसरातील हा मुख्य रस्ता दीर्घकाळापासून अत्यंत दयनीय अवस्थेत होता. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, दगड-मातीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या रस्त्याने साई कॉलनी, एकता कॉलनी, शंभुराजे चौक, मनोलिला नगर यांसह अनेक वसाहती जोडल्या जात असल्याने वाहतुकीचा मोठा ताण सतत जाणवत होता. स्थानिक नागरिकांनी वारंवार ही समस्या नगरसेवकांकडे मांडली होती.
मा नगरसेवक कुमार वाकळे यांनी या रस्त्याच्या प्रश्नाची दखल घेत आ. जगताप यांच्या मार्गदर्शनातून कामाला गती दिली. याआधीही वाकळे यांनी प्रभागात सिमेंट पाईप ड्रेनेज लाईन, स्ट्रीटलाईट, फेज टू पाईपलाईन अशा अनेक विकासकामांची अंमलबजावणी केली असून, गेल्या काही वर्षांत प्रभाग क्रमांक 7 बोल्हेगाव,नागपूर च्या शहरीकरणाला चालना मिळाली आहे.
सध्या सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे म्हसोबा चौक व प्रेमभारती नगर परिसरातील नागरिकांत उत्साहाचे वातावरण असून त्यांनी आमदार संग्राम जगताप व मा.नगरसेवक कुमार वाकळे यांचे आभार मानले आहेत.