अहिल्यानगर | 26 डिसेंबर 2025
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच आम आदमी पार्टीने (आप) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून निवडणूक रणधुमाळीत थेट उडी घेतली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अद्याप जागावाटपावर चर्चा सुरू असताना ‘आप’ने दहा उमेदवारांची यादी जाहीर करत इतर राजकीय पक्षांवर दबाव निर्माण केला आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र, महायुतीमध्ये अद्याप जागावाटपावरून ओढाताण सुरू आहे, तर महाविकास आघाडीनेही सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतलेली दिसत आहे. अशा परिस्थितीत आम आदमी पार्टीने पहिल्याच टप्प्यात उमेदवार जाहीर करून राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.
आम आदमी पार्टी पहिल्यांदाच अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून, महापालिकेच्या सर्व 68 जागांवर उमेदवार देण्याचा निर्धार पक्षाने जाहीर केला आहे. आगामी प्रचारासाठी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते अहिल्यानगरमध्ये येणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांनी दिली.
पहिल्या यादीतील उमेदवार
आम आदमी पार्टीच्या पहिल्या यादीत एकूण 10 उमेदवारांचा समावेश आहे —
प्रकाश जनार्धन वडवणीकर – प्रभाग 3-अ
दिलीप दत्तात्रय घुले – प्रभाग 3-ड
रामा आण्णा शिंदे – प्रभाग 6-अ
सुनील माणिकराव ठाकरे – प्रभाग 7-अ
विद्या विजय शिंदे – प्रभाग 7-ब
भरत श्रीराम खाकाळ – प्रभाग 7-ड
संदीप देविदास पखाले – प्रभाग 16-अ
राजू हिरालाल गुजर – प्रभाग 16-क
निर्मला विक्रम श्रीरसागर – प्रभाग 17-अ
राधा प्रकाश वडवणीकर – प्रभाग 3- ब
“अहिल्यानगरमध्ये स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार देण्यासाठी आम आदमी पार्टी सज्ज आहे. आम्ही सर्व 68 जागांवर निवडणूक लढवणार आहोत,” अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांनी दिली.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com