अहिल्यानगर | प्रतिनिधी
बोल्हेगाव येथील अहिल्यादेवी मित्र मंडळात मागील ३२ वर्षांपासून गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. यंदाच्या उत्सवाचा समारोप ‘मानाची आरती’ने झाला. अखेरच्या दिवशी आयोजित या महाआरतीला मा. नगरसेवक कुमारसिंह वाकळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमानिमित्त मंडळाच्या वतीने संगीत खुर्ची, लिंबू चमचा, नृत्य व इतर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना लहान मुलांपासून महिलांपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बक्षीस वितरण मा. नगरसेवक वाकळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष भाऊ कापडे यांच्या हस्ते नगरसेवक वाकळे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सोहळ्यास यशवंत परदेशी, मारुती कापडे, बाळासाहेब सोनवणे, अशोक फंड, बिपीन काटे, अमोल बोरकर, सचिन कदम, सावळाराम कापडे, दत्ता वीरकर, हेमंत पवार, महेश अडसूळ, दादा कापडे, सागर कोलते, देवराम कोलते, मच्छिंद्र कापडे, अनिकेत भंडारी, विकी गारदे, सोनू पांडे, अतुल देठे, प्रसन्ना गायकवाड यांच्यासह युवक, महिला व बालकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
गणेशभक्तांच्या उपस्थितीत झालेली आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे ३२ वर्षांची परंपरा यंदाही भक्ती, उत्साह आणि एकतेचे प्रतीक ठरली.