नगर : प्रतिनिधी
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर सध्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. महामार्गावरील कामकाजामुळे या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक शाखेने विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे सर्व अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाहतुकीचा बोजा लक्षात घेता प्रशासनाने पर्यायी मार्गांची माहिती देत चालक व वाहतूकदारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पर्यायी मार्गांची माहिती :
🔹 अहिल्यानगरकडून मनमाडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी
दूधडेअरी चौक – शेंडी बायपास – नेवासा फाटा – कायगाव टोक – गंगापूर – वैजापूर मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
🔹 अहिल्यानगरकडून संगमनेर व नाशिककडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी
कल्याण बायपास – आळेफाटा – संगमनेर मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
🔹 कोपरगावकडून अहिल्यानगरकडे येणाऱ्या वाहनांसाठी
कोपरगाव – पुणतांबा फाटा – वैजापूर मार्गे वाहनांना वळवण्यात येईल.
कमी उंचीच्या वाहनांसाठी : कोपरगाव – पुणतांबा – श्रीरामपूर – नेवासा फाटा मार्गे पर्यायी सोय उपलब्ध आहे.
🔹 सिन्नर – लोणी मार्गे अहिल्यानगरकडे येणाऱ्या वाहनांसाठी
संगमनेर – आळेफाटा मार्गे वाहनांना वळवण्यात आले आहे.
वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच महामार्गावरील सुरू असलेल्या कामात अडथळा आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.