अहमदनगर कॉलेजमध्ये भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

NSS, NCC, RRC आणि विद्यार्थी कल्याण मंडळाचा संयुक्त उपक्रम.

अहिल्यानगर | ०५ डिसेंबर २०२५

अहमदनगर कॉलेज, अहिल्यानगर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC), रेड रिबन क्लब (RRC), विद्यार्थी कल्याण मंडळ आणि सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात आयोजित करण्यात आले. या उपक्रमात ४७ रक्तदात्यांनी सहभागी होऊन मानवतेची सेवा बजावली.

बी पी एच ई संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. आर. जे. बार्नबस, सचिव विशाल बार्नबस आणि प्रभारी प्राचार्य डॉ. नोएल पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

शिबिराचा उद्घाटन समारंभ अहमदनगर कॉलेजच्या रजिस्ट्रार श्रीमती कल्पलता भिंगारदिवे यांच्या हस्ते झाला. यावेळी सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँकच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमैया खान, उपप्राचार्य डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, प्रा. दिलीपकुमार भालसिंग, विनानुदानित विभागप्रमुख डॉ. सय्यद रझाक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनावेळी रजिस्ट्रार श्रीमती भिंगारदिवे म्हणाल्या,रक्तदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा आहे. तरुणाईने अशा सामाजिक उपक्रमात पुढाकार घेणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद आहे.

सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँकच्या पथकाने सर्व दात्यांची प्रकृती तपासून योग्य सुरक्षा, स्वच्छता आणि वैद्यकीय नियमांचे पालन करत रक्तसंकलन केले. शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यांना अल्पोपहार देऊन प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले.

विद्यार्थी व स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग

शिबिरात NSS, NCC, RRC आणि विद्यार्थी कल्याण मंडळाच्या शिक्षकांचे तसेच विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय योगदान लाभले. राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ. माधव जाधव, प्रा. झरिना सय्यद, प्रा. अभिषेक सांगळे, प्रा. सीमा तिकोने यांनी विशेष समन्वय केला. स्वयंसेवकांनी रांगा व्यवस्थापित करणे, मार्गदर्शन, स्वच्छता आणि संपूर्ण कार्यक्रम सुरळीत चालवण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी डॉ. भागवत परकाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. रविकिरण लाटे यांनी केले.

“आजचे रक्तदाते हे उद्याचे खरे जीवनदाते आहेत. विद्यार्थ्यांनी दाखवलेली सामाजिक जबाबदारी आदर्शवत आहे.”

— श्रीमती कल्पलता भिंगारदिवे, रजिस्ट्रार, अहमदनगर कॉलेज

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!