Asia cup भारताचा आशिया कपवर कब्जा — टिळक वर्मा, कुलदीप यादव चमकले.

दुबई, २८ सप्टेंबर —

Asia cup आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवलेल्या या थरारक सामन्यात भारताची सुरुवात डळमळीत झाली होती, मात्र टिळक वर्मा आणि शिवम दुबे यांच्या संयमी भागीदारीने विजयाचा मार्ग सुकर केला.

Asia cup पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १५० धावा केल्या. साहिबजादा फरहान (५७) आणि फखर झमान (४६) यांनी दमदार सुरुवात दिली, पण मधल्या फळीत भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत पाकिस्तानला झुकवले. विशेषतः कुलदीप यादवने ४ षटकांत केवळ ३० धावा देत ४ गडी बाद केले आणि पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडले. बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर अक्षर पटेलनेही प्रभावी कामगिरी केली.

Asia cup भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक होती. अवघ्या २० धावांपर्यंत तीन गडी बाद झाले होते. चौथ्या क्रमांकावर आलेल्या संजू सॅमसनने २१ चेंडूंमध्ये २४ धावा करत १ षटकार आणि २ चौकार मारले. त्याच्या बाद झाल्यानंतर भारताची अवस्था ७३/४ अशी होती.

यानंतर टिळक वर्मा आणि शिवम दुबे यांनी पाचव्या विकेटसाठी महत्त्वाची भागीदारी करत डाव सावरला.

– टिळक वर्मा: ६९ धावा (५३ चेंडू), ४ षटकार, ३ चौकार

– शिवम दुबे: ३३ धावा (२२ चेंडू), २ षटकार, २ चौकार

या दोघांच्या खेळीमुळे भारताने १९.४ षटकांत लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला.

या विजयासह भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग तिसरा विजय नोंदवला. याआधीच्या दोन सामन्यांमध्येही भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. अंतिम सामन्यातील विजयामुळे भारताने आशिया खंडातील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!