अहिल्यानगर | प्रतिनिधी
बिहार एग्झिट पोल्स 2025 विविध एग्झिट पोल्सनी बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएच्या सरकारची शक्यता दर्शवली; महागठबंधनाला अपेक्षेपेक्षा कमी जागा.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आलेल्या एग्झिट पोल्समध्ये बहुतेक संस्थांनी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला असून,बिहार एग्झिट पोल्स 2025 मधे महागठबंधनाला ७० ते १०२ जागांपर्यंतच मर्यादा राहू शकते असे चित्र आहे.
संस्थानिहाय एक्झिट पोल आकडेवारी

संस्था. NDA. महागठबंधन. इतर
दैनिक भास्कर 145–160 73–91 5–10
JVC Polls 142–157 80–96 2–6
People’s Insight 133–148 87–102 3–6
Matrize Poll 147–167 70–90 0–2
People’s Pulse 138–155 75–101 4–7
मतदान संपल्याबरोबर देशभरात बिहार एग्झिट पोल्सचा जोर सुरू झालाय आणि जवळपास सगळ्याच सर्वे संस्थांनी एनडीएकडे बहुमताचे वारे वाहत आहेत असं स्पष्ट दाखवलंय. काही ठिकाणी तर आकडे इतके ठोस आहेत की १६० जागांच्या आसपास एनडीए पोहोचेल असं चित्र आहे.
दैनिक भास्कर आणि मॅट्राईझ या दोन्ही संस्थांनी एनडीएला ठाम लीड दिली असून, महागठबंधनाचं गणित थोडं बिघडलं असं दिसतंय. ग्रामीण भागात विकासाच्या मुद्द्यांवर एनडीएला चांगलं समर्थन मिळालंय, असं सर्वेक्षणातून दिसतं.
महागठबंधनने मात्र या पोल्सवर विश्वास न ठेवता मतमोजणीची वाट पाहण्याचं आवाहन केलंय. काही नेत्यांनी तर “हे पोल्स राजकीय हेतूने केलेले आहेत” अशी टीकाही केली. पण मतदारांच्या मनात काय आहे हे १४ नोव्हेंबरला मतमोजणीदरम्यानच स्पष्ट होईल.
प्रशांत किशोर यांच्या ‘जनसुराज’ पक्षाला अपेक्षित यश मिळण्याची चिन्हं फारशी नाहीत — जवळपास सर्वच संस्थांनी त्यांना शून्य ते दोन जागांपर्यंतच मर्यादित दाखवलंय. त्यामुळे मुख्य सामना पुन्हा एकदा एनडीए विरुद्ध महागठबंधन असाच राहतोय.
लोकांच्या चर्चेत सध्या एकच प्रश्न आहे — “बिहारमध्ये पुन्हा एकदा नीतीश कुमार मुख्यमंत्री होतील का?” याचं उत्तर फक्त काही दिवसांवर आलंय!