अहिल्यानगर | ११ ऑक्टोबर
बोल्हेगाव येथे श्री बिरोबा महाराज यात्रा यावर्षी उद्या, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पारंपरिक उत्साहात साजरी होणार आहे. सावेडी-बोल्हेगाव रस्त्यावर गावातील जुने मंदिर आहे या ठिकाणी ही यात्रा असणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही यात्रा गावाच्या वतीने आयोजित करण्यात आली असून, मंदिराचे पुजारी मारुती कापडे आणि त्यांचे कुटुंबीय यात्रेच्या सर्व धार्मिक विधी आणि आयोजनात पुढाकार घेत आहेत. यात्रेदिवशी बिरोबा मंदिराच्या काठीची विधिवत पूजा करण्यात येणार असून, त्यानंतर गावातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येईल.
भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन सायंकाळी पाच वाजल्यापासून करण्यात आले असून, भाविकांच्या आगमनापर्यंत ते सुरू राहील. हा महाप्रसाद बिरोबा मंदिर येथे दिला जाणार आहे.
गाव समिती आणि कापडे परिवाराच्या वतीने सर्व ग्रामस्थ, मित्र, नातेवाईक आणि भाविकांना या धार्मिक उत्सवात सहभागी होऊन श्री बिरोबा महाराजांच्या आशीर्वादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.