Breaking News बिबट्याने सहा वर्षाच्या मुलीला उचलून नेले !

अहिल्यानगर | १२ नोव्हेंबर

Breaking News

नगर तालुक्यातील खारे कर्जुने गावात हृदयद्रावक घटना घडली असून, बिबट्याने एका सहा वर्षांच्या मुलीला उचलून नेल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खारे कर्जुने येथे काही कुटुंबे शेतमजूर म्हणून काम करतात. सायंकाळी सुमारे सात वाजता, थंडी वाढल्याने कुटुंबातील सदस्य शेकोटीजवळ बसून ऊब घेत होते. त्यावेळी रियांका सुनील पवार ही सहा वर्षांची मुलगी त्यांच्या जवळच खेळत होती.

तेवढ्यात शेजारील तुरीच्या शेतातून अचानक एक बिबट्या आला आणि काही कळण्याआधीच रियांकाला उचलून घेऊन गेला. घरच्यांनी आरडाओरड करून पाठलाग केला, पण बिबट्या अंधारात गायब झाला.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी वस्तीवर मोठी गर्दी केली आणि शोधमोहीम हाती घेतली. परंतु, अद्याप मुलीचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही.

सध्या पोलिस व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, बिबट्याचा आणि मुलीचा शोध सुरू आहे. गावात प्रचंड भीतीचं वातावरण आहे.

शेजारील गावांना सावध राहण्याचे आवाहन

या घटनेनंतर वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना तसेच शेजारील इसळक, निंबळक, हिंगणगाव, जखनगाव, निमगाव घाणा या गावातील नागरिकांना काळजी घेण्याचे आणि रात्री आवश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

नवीन बातम्यांसाठी 👉  Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!