अहिल्यानगर (प्रतिनिधी):
येथील बोल्हेगाव विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या वतीने दसऱ्याचे औचित्य साधून आज सभासदांना मिठाईचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. सभापती कुमार वाकळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सभासदांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना वाकळे यांनी सांगितले की, “सोसायटी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतीविषय मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठीचे उपक्रम सोसायटीने कायमच राबवले आहेत.”

चेअरमन किसन कोलते यांनी सांगितले की, सभासदांना कर्जवाटप, शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे तसेच कृषी मार्गदर्शनाची सुविधा देण्याचे काम सोसायटी सातत्याने करत आहे.शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय नेहमीच सोसायटीच्या अग्रस्थानी राहिले आहेत.
या कार्यक्रमात सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मंचावर चेअरमन किसन उमाजी कोलते, व्हा. चेअरमन सूर्यभान वाटमोडे, सचिव रेवजी निमसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सभासद रुपचंद कळमकर, सुनील देठे, संपत पाटील वाकळे, मा. चेअरमन बबन कळमकर, बाबजी वाकळे, मोहन डूरकुले, सुभाष वाकळे, कांतिलाल वाकळे, ज्येष्ठ नागरिक कचरू नाना वाकळे, राजू देठे, रेहमान सय्यद, बबन कराळे, बहीरू कराळे, ज्ञानदेव कापडे, संपत आरडे, यशवंत परदेशी रामचंद्र कोलते,प्रकाश वाटमाडे, वैभव वाटमोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज वाकळे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव वाटमोडे यांनी केले.