डॉ. अभय बंग नगरकरांसोबत करणार जीवनमूल्यांचा संवाद

अहिल्यानगर | प्रतिनिधी

मानवी जीवनाला दिशा दाखवणारे आणि ग्रामीण आरोग्यसेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे विचार नगरकरांना प्रत्यक्ष ऐकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. ‘जगावं कशासाठी व कसे?’ या विषयावर त्यांचा संवाद रविवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० या वेळेत हॉटेल संजोग, मनमाड रोड, सावेडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. अभय बंग हे SEARCH (Society for Education And Rural Community Health) या संस्थेचे संस्थापक व संचालक असून, ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्यसेवा, महिलांच्या आरोग्यविषयक चळवळी तसेच समाजमनाला भिडणारे संशोधन यासाठी ते जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत.

या संवादाचे आयोजन डॉ. धनंजय वारे (डी.एम. कार्डिओलॉजिस्ट) आणि डॉ. महेश जरे (डी.एम. कार्डिओलॉजिस्ट) यांनी केले आहे. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची सोय करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी आरोग्यसदन हॉस्पिटल, सावेडी येथील हृदयरोग विभागाशी संपर्क साधावा किंवा ९६५७६१३६३५ / ८८५५०५०४२१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!