मुंबई | प्रतिनिधी
आरोग्य विशेष
सध्याच्या दमट हवामानामुळे आणि सततच्या ओलसर पणामुळे राज्यात फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग) च्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ‘रिंगवर्म’ (Ringworm) म्हणून ओळखला जाणारा हा संसर्ग संसर्गजन्य असल्याने, कुटुंबातील एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे त्याचा फैलाव त्वरित होतो. हा धोका पाहता, केवळ औषधोपचार पुरेसा नाही; तर घरात कठोर प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छता पाळणे अत्यावश्यक असल्याचे त्वचारोग तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
संसर्ग झाला असल्यास ही त्रिसूत्री पाळा
फंगल इन्फेक्शन झालेले असल्यास, ते लवकरात लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी तसेच इतरांना न होण्यासाठी खालील तीन स्तरांवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे:
१. वैद्यकीय उपचारात खंड नको
तज्ज्ञांचा सल्ला घ्या: कोणताही साधा संसर्ग स्वतःच्या मनाने (Over-the-counter) क्रिम लावून बरा करण्याचा प्रयत्न करू नका. त्वचारोग तज्ज्ञांकडून (Dermatologist) योग्य निदान करून अँटी-फंगल गोळ्या आणि क्रिमचा संपूर्ण कोर्स पूर्ण करा.
औषधोपचार पूर्ण करा: लक्षणे कमी झाली, तरी डॉक्टरांनी सांगितलेला कोर्स पूर्ण करा. अर्धवट उपचारामुळे संसर्ग पुन्हा वाढतो आणि उपचार करणे कठीण होते.
खाजवणे टाळा: इन्फेक्शन झालेल्या जागेला स्पर्श करणे किंवा खाजवणे पूर्णपणे टाळा. यामुळे संसर्ग अधिक पसरतो.
२. कुटुंबात फैलाव रोखण्यासाठी दक्षता
वस्तू वेगळ्या ठेवा: संसर्ग झालेल्या व्यक्तीचा टॉवेल, कपडे, अंथरूण आणि चप्पल इतरांपासून पूर्णपणे वेगळे ठेवा. या वस्तू दररोज गरम पाण्यात डिटर्जंट वापरून धुवा.
त्वचा ठेवा कोरडी: अंघोळीनंतर शरीराची प्रत्येक जागा (विशेषतः त्वचेच्या घड्या) चांगल्या प्रकारे कोरडी पुसून घ्या. कोरडेपणा हा फंगसचा सर्वात मोठा शत्रू आहे.
सैल सुती कपडे वापरा: घट्ट कपड्यांऐवजी सैल, सुती (Cotton) कपडे घाला, ज्यामुळे हवा खेळती राहते.
३. उपचारांना पूरक घरगुती उपाय
डॉक्टरी उपचारांसोबत खाज आणि जळजळ कमी करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय मदत करतात, पण ते औषधांना पर्याय नाहीत

त्वचारोग तज्ज्ञांचा इशारा: “हे घरगुती उपाय प्राथमिक अवस्थेत मदत करतात. पण जर संसर्ग गंभीर असेल किंवा घरगुती उपायांनी चार-पाच दिवसांत फरक पडत नसेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या,” असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.