नवी दिल्ली | प्रतिनिधी
सोने आणि चांदीचे दर 2025 मध्ये सतत वाढत होते. पण गेल्या आठवड्यात प्रथमच मोठी घसरण दिसून आली असून ग्राहकांसाठी ही खरेदीची सुवर्णसंधी ठरू शकते. बाजारातील आकडेवारीनुसार, चांदीच्या दरात तब्बल ८,२३८ रुपयांची घसरण झाली आहे, तर सोन्याच्या एका तोळ्याच्या दरातही १,६४८ रुपयांची घट नोंदवली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ५ डिसेंबर एक्सपायरी असलेल्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 132294 रुपयांवरून खाली येत 124195 रुपये झाला. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाईटनुसार, 14 नोव्हेंबरला 124794₹ असलेला 24 कॅरेट सोन्याचा दर 21 नोव्हेंबरला 123146₹ वर आला. 22 कॅरेट सोनं 120190₹, 20 कॅरेट 109600₹, 18 कॅरेट 99750₹ तर 14 कॅरेट सोनं 79430₹ प्रति तोळा एवढं विकले जात आहे.
दरम्यान, चांदीच्या बाजारात आणखी मोठी घट झाली आहे. MCX वर 14 नोव्हेंबरला 156018₹ प्रति किलो असलेली चांदी 21 नोव्हेंबरला 154052₹ वर आली. देशांतर्गत बाजारात तर ही किंमत 159367₹ वरून थेट 151375₹ पर्यंत घसरली — म्हणजे तब्बल ८,२३८ रुपयांनी घट!
तज्ज्ञांच्या मते, सध्या बाजारातील घसरण ही तात्पुरती असू शकते. जागतिक आर्थिक बाजारातील बदल, डॉलरची स्थिती आणि व्याजदरांचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर होतो. मात्र, आगामी विवाहसोहळे आणि सणासुदीच्या काळामुळे पुढील काही दिवसांत दर पुन्हा वाढू शकतात.
ग्राहकांसाठी हा खरेदीचा चांगला काळ मानला जात असून, ज्वेलर्सही आकर्षक ऑफर्स देत आहेत. दरम्यान, गुंतवणूकदार मात्र सोनं खरेदी करण्यापेक्षा चांदीकडे अधिक आकर्षित होत असल्याचं दिसत आहे.
नवीन बातम्यांसाठी 👉 http://ahilyanagar24live.com