अहिल्यानगर (प्रतिनिधी) –
शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली. महानगरपालिकेची MH16 CC 6325 क्रमांकाची बस एका पेताड ड्रायव्हरने मनमाड रोडवर भरधाव वेगाने पळवली. या प्रवासादरम्यान अनेक महिला व पुरुष दुचाकीस्वारांसह वाहनचालकांना अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला.
बसचा भरधाव वेग आणि चालकाची बेपर्वा वागणूक पाहून नागरिक भयभीत झाले. बसमधील प्रवासीही घाबरले होते. अनेक महिला दुचाकीस्वारांनी, “आम्ही वाचलो हीच मोठी गोष्ट,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

या प्रसंगात सामाजिक कार्यकर्ते हेमंत भुतकर, मा.नगरसेवक भैरवनाथ वाकळे यांनी तत्परतेने पुढाकार घेतला. त्यांना तोफखाना पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल यांनी सहकार्य केले. दोघांनी मिळून सारडा कॉलेजसमोर स्वतःचे वाहन आडवे लावून बस थांबवली. त्यानंतर बस चालकाला थेट तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी बस चालक व वाहक या दोघांनीही त्यांना नेमून दिलेला ड्रेस परिधान केलेला नव्हता, हे विशेष लक्षवेधी ठरले.

पोलिसांनी संशयित ड्रायव्हरला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेच्या बससेवेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. अशा बेपर्वा चालकांवर कठोर कारवाई करूनच नागरिकांचा विश्वास परत मिळू शकतो, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
खूप भयंकर आहे हे
प्रवाशांचे जीव धोक्यात घालणा-यांना प्रशासनाने वेळीच घरचा रस्ता दाखवला पाहिजे.