नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा जर्सी स्पॉन्सर निश्चित झाला असून अपोलो टायर्स या कंपनीने तब्बल ५७९ कोटी रुपयांचा करार बीसीसीआयसोबत केला आहे. हा करार मार्च २०२८ पर्यंत लागू राहणार असून पुरुष व महिला दोन्ही राष्ट्रीय संघांच्या सामन्यांमध्ये अपोलो टायर्सचा लोगो जर्सीवर झळकणार आहे.
यापूर्वी ड्रीम ११ ही कंपनी भारतीय संघाची मुख्य जर्सी स्पॉन्सर होती. नवीन करारामुळे बीसीसीआयला अधिक महसूल मिळणार असून ब्रँडिंगच्या दृष्टीने अपोलो टायर्ससाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
क्रिकेट विश्लेषकांच्या मते, अपोलो टायर्ससारख्या भारतीय ब्रँडचा संघाशी संबंध येणे हे देशी कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळवून देणारे पाऊल आहे.