भारतात आजपासून iPhone 17 सिरीज विक्रीसाठी उपलब्ध – पाहा संपूर्ण किंमती व ऑफर्स

नवी दिल्ली | १९ सप्टेंबर २०२५

भारतातील iPhone प्रेमींसाठी आजचा दिवस विशेष ठरला आहे. Apple कंपनीची नवी iPhone 17 सिरीज आजपासून अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबादसह देशभरातील Apple Premium Resellers, ऑनलाइन स्टोअर्स आणि अधिकृत रिटेल भागीदारांकडे या फोनची विक्री सुरू झाली आहे.

कंपनीने यावेळी iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max असे चार मॉडेल्स बाजारात आणले आहेत. या सर्व मॉडेल्स वेगवेगळ्या स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. किंमती पुढीलप्रमाणे जाहीर झाल्या आहेत:

iPhone 17 (256GB) – ₹ 82,900

iPhone 17 (512GB) – ₹ 1,02,900

iPhone Air (256GB) – ₹ 1,19,900

iPhone Air (512GB) – ₹ 1,39,900

iPhone Air (1TB) – ₹ 1,59,900

iPhone 17 Pro (256GB) – ₹ 1,34,900

iPhone 17 Pro (512GB) – ₹ 1,54,900

iPhone 17 Pro (1TB) – ₹ 1,74,900

iPhone 17 Pro Max (256GB) – ₹ 1,49,900

iPhone 17 Pro Max (512GB) – ₹ 1,69,900

iPhone 17 Pro Max (1TB) – ₹ 1,89,900

iPhone 17 Pro Max (2TB) – ₹ 2,29,900

कंपनीकडून आणि विक्रेत्यांकडून अनेक आकर्षक ऑफर्सही उपलब्ध आहेत. निवडक बँक कार्डांवर कॅशबॅक, नो-कोस्ट EMI सुविधा, तसेच जुन्या फोनच्या एक्सचेंजवर बोनस दिला जात आहे. Reliance Digital व Croma सारख्या रिटेलर्सकडून थेट सवलती देण्यात आल्या आहेत.

ग्राहकांसाठी हा लॉन्च एक मोठा आकर्षण ठरत असून, नवीन फोन खरेदी करण्यासाठी स्टोअर्सबाहेर रांगा दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!