आ.जगताप यांच्या पुढाकारातून 80 घंटागाड्या रस्त्यावर धावणार,शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार ?

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

अहिल्यानगर कचरा संकलन मोहिमेला अखेर गती मिळाली आहे. शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अहिल्यानगर कचरा संकलन उपक्रमांतर्गत ८० नवीन घंटागाड्यांचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात मा.महापौर, नगरसेवक, हायजिन फर्स्ट कंपनीचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील कचरा संकलन व्यवस्थेत गेल्या काही महिन्यांपासून अडचणी येत होत्या. अनेक प्रभागांत नियमितपणे घंटागाड्या न फिरल्याने नागरिकांत नाराजी होती. या पार्श्वभूमीवर आ. संग्राम जगताप यांनी स्वच्छता मोहिमेची सूत्रे स्वतःहून हातात घेतली असे बोलले जात आहे. त्यांनी महापालिकेसह हायजिन फर्स्ट या कंत्राटदार कंपनीसोबत बैठक घेत नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी नवी योजना राबवली.

या योजनेअंतर्गत शहरात दररोज सकाळी ७ ते दुपारी २ दरम्यान सर्व प्रभागांमध्ये घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन केले जाणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र वाहनचालक आणि सहाय्यक नेमण्यात आले असून, त्यांची GPS द्वारे देखरेख केली जाणार आहे.

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक गाडीवर QR कोड असणार असून नागरिकांना त्या द्वारे आपल्या परिसरातील गाडीची माहिती आणि वेळ पाहता येणार आहे. त्यामुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढेल, अशी माहिती महापालिकेने दिली.

शहरातील सर्व ६५ प्रभागांमध्ये दररोज घराघरातून कचरा गोळा करून तो थेट प्रक्रिया केंद्रात नेण्यात येईल. या प्रणालीमुळे डंपिंग यार्डवरील भार कमी होईल आणि शहर स्वच्छतेकडे वाटचाल करेल. नागरिकांना ऑनलाईन फीडबॅक देण्यासाठीदेखील मोबाइल अॅप विकसित करण्यात येत आहे.

आ.संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, तसेच विविध पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

आ. संग्राम जगताप यांनी सांगितले की, “शहरातील स्वच्छतेसाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. मुंबईप्रमाणे आपल्या शहरातही रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण आणि चौक सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. ‘हायजिन फर्स्ट’च्या माध्यमातून स्वच्छ अन्न आणि स्वच्छ परिसर या दोन्ही दिशांनी जनजागृती केली जात आहे.” त्यांनी पुढे इशारा देत सांगितले की, “रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई करावी. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनीही शहरात फिरून काम पाहिले नाही तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल.”

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, “शहरातील कचरा संकलनासाठी स्वयंभू ट्रान्सपोर्ट या नवीन एजन्सीची नेमणूक झाली आहे. 80 घंटागाड्या आता रोज घरोघरी जाऊन कचरा संकलन करतील. जर कोणत्या भागात घंटागाडी आली नाही तर नागरिकांनी हेल्पलाइनवर संपर्क साधावा — तातडीने सेवा दिली जाईल.” त्यांनी हेही सांगितले की, अहिल्यानगर महानगरपालिका सध्या देशात ‘ड’ वर्ग महानगरांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, आणि हा क्रमांक पहिल्यावर नेण्याचा संकल्प आहे.

वैशाली गांधी म्हणाल्या की, “हायजिन फर्स्ट या संस्थेमार्फत ‘हायजिन सिटी’ बनवण्याचे काम सुरू आहे. 80 घंटागाड्यांच्या माध्यमातून प्रत्येक घर, परिसर आणि रस्ता स्वच्छ ठेवणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे.”

मनोज कोतकर यांनी सांगितले की, “गेल्या काही दिवसांपासून शहरात कचऱ्याची समस्या गंभीर झाली होती, परंतु आमदार जगताप यांच्या पुढाकारामुळे आता हा प्रश्न मार्गी लागेल.”

यावेळी संजय शेंडगे, उपायुक्त संतोष टेगळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, अनिल बोरुडे, दीपक सूळ, स्थायी समितीचे माजी चेअरमन किशोर डागवाले, मनोज कोतकर, कुमारसिंह वाकळे, अविनाश घुले, संजय चोपडा, रेश्मा आठरे, लता शेळके, निखिल वारे, सचिन जाधव, शिवाजी चव्हाण, धनंजय जाधव, संभाजी पवार, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, प्रकाश भागानगरे, विनीत पाऊलबुद्धे, रामदास आंधळे,अमोल गाडे, प्रा. माणिकराव विधाते, हनुमंत कातोरे, विजय गव्हाळे, सचिन शिंदे, अरविंद शिंदे, अजय चितळे, मनोज साठे, दत्ता मुदगल, युवराज शिंदे, विपुल शेटीया, ज्ञानदेव पांडुळे, दगडू पवार, संजय ढोणे, सुनील त्रिंबके, सतीश शिंदे, महेश लोंढे, महेश तवले, अभिजीत बोरुडे, जितू गंभीर, वैभव ढाकणे, वैभव वाघ, शंभू गिरवले, सुनील कोतकर, महेंद्र कांबळे, संतोष ढाकणे, सारंग पंधाडे, रणजीत सत्रे, जालिंदर कोतकर, सुमित लोंढे, नितीन शेलार, प्रदीप परदेशी, सुरेश बनसोडे, अतुल जाधव, गोरख पडोळे, दीपक खेडकर, अमित खामकर, टिनू भंडारी, प्रशांत बेल्हेकर, सोनू घेबुड, सुजय मोहिते, अशोक साबळे आदीसह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन हायजिन फर्स्टचे प्रतिनिधी महेश पवार यांनी केले.

One thought on “आ.जगताप यांच्या पुढाकारातून 80 घंटागाड्या रस्त्यावर धावणार,शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार ?

  1. इलेक्शन जवळ आले म्हणून तर हा खटाटोप नाही ना?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!