अहिल्यानगर| प्रतिनिधी
शहरात आज सकल मातंग समाजाच्या वतीने ‘लहू शक्ती भीमशक्ती महागर्जना मोर्चा’ पार पडला. विविध प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो समाजबांधवांनी सहभाग घेत प्रशासनाला निवेदन देत अन्यायाविरोधात आवाज बुलंद केला.
प्रथम लालटाकी येथील क्रांतीगुरु लहुजी वस्ताद चौकात सभा घेण्यात आली. या सभेत सुनील उमाप, विजुभाऊ पठारे, राम वडागळे, अंकुश मोहिते, सुमित गायकवाड, अशोकराव गायकवाड, अजिंक्य भैय्या चांदणे, शाहू राजे वडागळे, पप्पू पाटील, प्रदीप भाऊ सरोदे, निलेश सरोदे, संदीप सकट, सचिन बगाडे, विनोद वैरागर, बाळासाहेब लोंढे, सौ. शितल वडागळे, सौ. अंजना शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सभेत वक्त्यांनी जातीयवादी प्रवृत्ती, सोनई पोलिसांच्या पक्षपाती कारवाईवर टीका करत, समाजावरील अन्याय तात्काळ थांबवावा अशी मागणी केली.
यावेळी जातीय अपशब्द वापरणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करावेत.अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची त्वरीत घोषणा करावी.संजर वैरागर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करून कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे.दलितांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत. अमोल वांडेकर, अनिल शेटे, आकाश बेग, संदीप लांडे यांच्या वडिलांवरील धमकी प्रकरणात विशेष कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत.यासह अनेक मागण्या करण्यात आल्या.
यानंतर लहुजी वस्ताद चौकातून मोर्चाची पायी सुरुवात झाली. मोर्चा पत्रकार चौक, तारकपूर बसस्थानक, डिएसपी चौक, महानगरपालिका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
नविन बातम्यांसाठी 👉 ahilyanagar24live@gmail.com