अहिल्यानगर (प्रतिनिधी):
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गोरख दळवी, संभाजी सप्रे आणि गणेश होळकर या तिघांना शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी हाके यांच्या वाहनावर तिघांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात पोलिसांनी तिघांनाही अटक केली होती.
ही घटना त्या वेळी घडली, जेव्हा ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे अहिल्यानगरमधून सभेला जात होते. अचानक त्यांच्या वाहनावर गोरख दळवी, संभाजी सप्रे आणि गणेश होळकर यांनी हल्ला केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती.
घटनेनंतर नगर तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपींच्या बाजूने ॲड. महेश तवले आणि ॲड. योगेश नेमाणे यांनी काम पाहिले, तर ॲड. संजय वाल्हेकर, ॲड. महेश शेडाळे आणि ॲड. अनुराधा येवले यांनी त्यांना सहाय्य केले.
न्यायालयाने सर्व बाजू ऐकल्यानंतर तिघांनाही जामीन मंजूर केला.
Dear http://ahilyanagar24live.com/fekal0911 Administrator