दहशत माजवणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद ?

नगर | प्रतिनिधी 

नगर तालुक्यातील खारे कर्जुने गावात 6 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या हल्ल्यामुळे भीतीचे सावट होते. त्यानंतर केवळ काही दिवसांत इसळक येथे 8 वर्षांच्या मुलावर बिबट्याने झडप घातली होती. या दोन घटना एकामागून एक घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि संताप निर्माण झाला होता.

घटनांनंतर वनविभागाने अनेक ठिकाणी सापळे, ड्रोन कॅमेरे व पिंजरे लावून सतत शोधमोहीम सुरू ठेवली होती. आज 17 नोव्हेंबर रोजी पहाटे च्या सुमारास खारे कर्जुने शिवारातील कावरे यांच्या पोल्ट्री फार्मजवळ लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पिंजरा लावलेल्या ठिकाणी रात्रीपासूनच हालचाल दिसत होती. पहाटे पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर वनविभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बिबट्याला सुरक्षितपणे गाडीत हलवण्यात आले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.

बिबट्या पकडला गेल्याची माहिती समजताच स्थानिकांमध्ये उलट सुलट चर्चा चालू झाली आहे. मागील 15 दिवसांपासून गावांमध्ये रात्री बाहेर पडणे, शेतावर जाणे आणि मुलांना एकटे सोडणे धोकादायक बनले होते.नागरिकांच्या मते एक बिबट्या जेरबंद जरी झाला असला तरी परिसरात बिबट्यांची संख्या एक पेक्षा जास्त असून वन विभागाच्या टीम ने सतर्क राहून इतर बिबट्यांनाही जेरबंद करावे.आज पकडलेला बिबट्या गावात नागरिकांना दाखवणे अपेक्षित असताना वन विभागाने ते केले नाही हा बिबट्या नरभक्षक नसून वनविभागाने बिबट्याचे पिल्लू पकडल्याचे स्थानिकांनी सांगितले त्यामुळे परिसरात अजूनही दहशतीचे वातावरण आहे.

वनविभागाने आता पकडलेल्या बिबट्याचे वैद्यकीय परीक्षण केल्यानंतर त्याला नियमानुसार सुरक्षित वनक्षेत्रात हलविण्याची तयारी सुरू केली असल्याचेही समोर आले आहे.

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://ahilyanagar24live.com

One thought on “दहशत माजवणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद ?

  1. आता त्याला जाऊ द्या गुजरातमध्ये वनताराला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!