मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र – राज्य सरकारने आज शेतकऱ्यांसाठी २,२१५ कोटी रुपयांचे मोठे मदत पॅकेज जाहीर केले आहे. या मदतीत विशेषत: पूरग्रस्त आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकरी लाभार्थी असणार आहेत.
कृषी मंत्री दत्तात्रय भारणे यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यातील अंदाजे ६.५ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, या भागातील ७.७ लाख शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळणार आहे.
भरपाई दर:
– पर्जन्यनिर्भर शेती – ८,५०० रुपये प्रति हेक्टर
– सिंचित शेती – १७,००० रुपये प्रति हेक्टर
– फळबागा – २२,५०० रुपये प्रति हेक्टर
राज्यभरातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
लातूर, पारभणी, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही मदतीची मागणी वाढली आहे. ही मदत रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा देईल.
weed delivery stealth private orders