अहिल्यानगर|प्रतिनिधी;
जिल्ह्यात मोफत उद्योजकता प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या माध्यमातून युवक-युवतींसाठी रोजगार व स्वावलंबनाच्या नव्या संधी उघडल्या जात आहेत. जिल्हा उद्योग केंद्र, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोफत उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार असून, सर्वसाधारण तसेच विशेष घटक योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यात विविध प्रशिक्षण सत्रे होणार आहेत. या मोफत उद्योजकता प्रशिक्षण उपक्रमातून तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
या प्रशिक्षणात डाटा एन्ट्री ऑपरेटर, फॅशन डिझाईनिंग, ब्युटी पार्लर, बेकरी प्रॉडक्ट्स, हॉटेल मॅनेजमेंट, ड्रोन ऑपरेशन, तसेच दुचाकी व तीनचाकी वाहन दुरुस्ती अशा विषयांचा समावेश आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना कौशल्य विकासासोबत स्वतःचा व्यवसाय उभारण्याची प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
अर्जदार किमान आठवी उत्तीर्ण असावा, तसेच वय 18 ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी उमेदवारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सल्ला दिला जाणार आहे.
या संदर्भात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दीपक शिवदास व एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी रमेश जाधव यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे युवकांना केवळ रोजगार मिळणार नाही, तर स्वतःचे उद्योग उभारून इतरांनाही रोजगार देण्याची संधी मिळेल. शासनाच्या स्वावलंबी भारत संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा कार्यक्रम आहे.