अहिल्यानगर|प्रतिनिधी | Ahilyanagar24live.com|Sports Desk
अहिल्यानगरच्या साईदीप हिरोज क्रिकेट अकादमीचे संस्थापक संदीप घोडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली व एस के क्रिकेट अकादमीच्या प्रशिक्षक संदीप आडोळे सर यांच्या नेतृत्वात क्रिकेट खेळणाऱ्या समता विद्या मंदिर स्कूल, मुंबईच्या संघाने Harris Shield स्पर्धेत इतिहास रचला आहे.
मुंबईतील प्रतिष्ठित Harris Shield Cricket Tournament मध्ये समता विद्या मंदिर स्कूलने पहिल्यांदा फलंदाजी करत फक्त 45 षटकांत तब्बल 680 धावा उभारल्या. या जबरदस्त डावात अनिकेत सिनारेने 151 नाबाद धावा करत चमकदार खेळी साकारली. त्याला सार्थक शिंदे आणि रोहन कराळे यांनी उत्कृष्ट साथ दिली.

फलंदाजीसह गोलंदाजीतही सार्थक आणि रोहन यांनी प्रभावी कामगिरी करत संघाला 550 धावांनी विजय मिळवून दिला. या कामगिरीने मुंबई क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
या सर्व यशामागे साईदीप हिरोज क्रिकेट अकादमीचे संस्थापक संदीप घोडके सर आणि एस के क्रिकेट अकादमीचे संदीप आडोळे सर यांचे समर्पित प्रशिक्षण आणि खेळाडूंची अथक मेहनत आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली हे तरुण खेळाडू दिवस-रात्र सराव करीत आहेत.
खेळाडूंच्या मेहनतीबद्दल बोलताना स्थानिकांनी सांगितले की, “रात्री अपरात्री कॉल आला की हे खेळाडू तत्काळ ट्रॅव्हल पकडून मुंबईला मॅचसाठी जातात आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मैदानात उतरतात – हीच त्यांची जिद्द आणि क्रिकेटवरील निष्ठा आहे.”
“क्रिकेटमध्ये मोठं यश मिळवायचं असेल तर योग्य मार्गदर्शकाची साथ आणि सातत्यपूर्ण मेहनत अत्यावश्यक आहे.”
— संदीप आडोळे सर, संस्थापक, एस के क्रिकेट अकादमी
या शानदार विजयाने अहिल्यानगर, एस के क्रिकेट अकादमी आणि साईदीप हिरोज क्रिकेट अकादमीचे नाव पुन्हा एकदा राज्यभर गाजले आहे.
नवीन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com