नगर | प्रतिनिधी
नगर-अहिल्यानगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी चिचोंडी पाटीलचे सरपंच आणि खासदार निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी शरद पवार यांची आज निवड करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या प्रसंगी खासदार निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे, ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, जि.प. सदस्य माधवराव लामखडे, बाळासाहेब हराळ, सरचिटणीस सिताराम काकडे, उपाध्यक्ष प्रकाश पोटे, उद्धवराव दुसुंगे, शरद बडे, केशव तात्या बेरड, पापामिया पटेल, चंदूकाका पवार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संपतभाऊ मस्के, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, बाजार समितीचे माजी चेअरमन बाबासाहेब गुंजाळ, ज्येष्ठ नेते आबा कोकाटे सर, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण मस्के, तसेच प्रवीण कोकाटे, डॉ. मारुती ससे, गणेश तोडमल, महेंद्र शेळके, संदीप कोकाटे, महादेव खडके, वैभव कोकाटे, संदीप काळे, प्रकाश कांबळे, बाबा सय्यद, संतोष कोकाटे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार यांचे वक्तव्य:
“देशाचे नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू, फुले, आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने आम्ही पुढे चाललो आहोत. पक्षाचे ध्येय धोरण आणि सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे कार्य आम्ही सातत्याने करत आलो आहोत. आज या विश्वासाची पावती म्हणून मला तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे,” असे शरद पवार यांनी सांगितले.

खासदार निलेश लंके यांचा विश्वास:
“सरपंच शरद पवार यांनी अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे शासन दरबारी मांडले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी पक्ष अधिक बळकट होईल,” असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
नवीन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24Live.com