नागरदेवळेतील गणेशोत्सवात महिला-युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; आघोरी शिवभक्ताचा देखावा ठरला आकर्षण

अहिल्यानगर (प्रतिनिधी) :

नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे सिद्धेश्वर व्यायामशाळा व मळथडी मित्र मंडळ (दक्षिणमुखी हनुमान मंदिर) यांच्या वतीने गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सलग आठ दिवस विविध सांस्कृतिक, पारंपरिक व स्पर्धात्मक उपक्रमांनी ग्रामस्थांना आकर्षित केले.

उत्सवाच्या दरम्यान महिलांसाठी आणि युवतींसाठी खास स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विशेषतः होम मिनिस्टर या खेळासह इतर स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विसर्जन दिनी परितोषिक वितरण सोहळा पार पडला. युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्हे व बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी शरद झोडगे, महेश झोडगे यांच्यासह मित्र मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विसर्जन मिरवणुकीत आघोरी शिवभक्ताचा देखावा सादर करण्यात आला. हा देखावा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरला. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचे पारंपरिक स्वर आणि भक्तिगीतांच्या वातावरणात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

गणेशोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी महेशभाऊ झोडगे मित्र मंडळाने विशेष परिश्रम घेतले. महिला व युवकांचा मोठा सहभाग असल्याने नागरदेवळेतील गणेशोत्सव यंदा अधिक रंगतदार ठरला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!