अहिल्यानगर | १३ सप्टेंबर २०२५ :
सध्या शहरात आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे सीना नदीसह ओढे-नाल्यांना पाणी वाढले असून काही भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता खड्डे आणि पाण्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
काही भागात विजेचा पुरवठा खंडित झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची कसोटी या पावसात लागणार आहे.
सध्या आकाश ढगाळ असून पाऊस सतत सुरू आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.