- अहिल्यानगर | १५ सप्टेंबर २०२५
अहिल्यानगरसह राज्यभर पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन, जिल्ह्याला एलो अलर्ट.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सोमवार व मंगळवार या दोन दिवसांसाठी शाळा प्रशासनाने परिस्थिती पाहून शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे सांगितले आहे.
हवामान खात्याने या भागासाठी येलो अलर्ट जारी केला असून ढगाळ वातावरणासह मुसळधार सरींचा अंदाज व्यक्त केला आहे. सकाळपासूनच शहरात व परिसरात अधूनमधून पाऊस सुरू असून, काही गावांमध्ये मुसळधार सरींमुळे ओढे-नाले भरू लागले आहेत.
पुढील २ दिवसांचा अंदाज
मंगळवार (१६ सप्टेंबर): येलो अलर्ट कायम; शहर व ग्रामीण भागात मुसळधार पावसाची शक्यता.
बुधवार (१७ सप्टेंबर): ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी सुरू राहणार.
राज्यातील स्थिती
मुंबई, ठाणे, रायगडमध्ये रेड व ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, पुणे घाटमाथा, कोकण व विदर्भातही पावसाचा जोर राहणार आहे. वाहतुकीस अडथळे, विजेचे खंडित होणे आणि पाणी साचणे अशी समस्या उद्भवू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नागरिकांना सूचना
नदी-नाले ओसंडण्याचा धोका असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, शाळांना दिलेल्या सुट्टीच्या निर्णयाचा पालकांनी योग्य विचार करून मुलांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे.