श्री रेणुका मातेला पंचक्रोशीतील भाविकांची ओढ; एपीआय माणिक चौधरी सपत्निक आरतीला उपस्थित

अहिल्यानगर (प्रतिनिधी) 

एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टतर्फे शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, पंचक्रोशीतील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी दररोज मंदिरात गर्दी करत आहेत.

नवरात्राच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सपत्निक देवीची आरती करून दर्शन घेतले. या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

दररोज मंदिरात आरती, कीर्तन, गोंधळ यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आकर्षक सजावट, रोषणाईत नटलेला मंडप आणि भक्तिरसपूर्ण वातावरणामुळे मंदिर परिसर उत्साहाने भरून गेला आहे.

नवरात्रोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ तसेच विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

या वेळी एपीआय माणिक चौधरी म्हणाले की, “नवरात्र हा केवळ धार्मिक नव्हे तर श्रद्धा, एकोपा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. देवी उपासनेतून आपण धैर्य, संयम आणि शक्तीची प्रेरणा घेतो. प्रत्येकाने या उत्सवातून महिलांबद्दल आदर, सकारात्मक विचार आणि नवा उत्साह घेण्याची गरज आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!