अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम अंतिम टप्प्यात; आमदार संग्राम जगताप यांची पाहणी

कॉम्प्लेक्समुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील — आमदार जगताप

अहिल्यानगर | 03 डिसेंबर 2025

शहरातील सारसनगर परिसरातील अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आले असून, लवकरच हे अत्याधुनिक केंद्र खेळाडूंसाठी खुले होणार आहे. राज्य सरकारच्या निधीतून उभारलेल्या या भव्य प्रकल्पाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी ओंकार घोलप उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले की, या कॉम्प्लेक्समुळे शहरातल्या विद्यार्थ्यांना आणि युवा खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. “शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडेही वळावे. क्रीडा क्षेत्रात करिअरच्या असंख्य संधी आहेत आणि सरकारी नोकरीतही खेळाडूंना आरक्षणाचे फायदे मिळतात,” असे ते म्हणाले.

“पुढील पिढीसाठी सक्षम, आधुनिक आणि सर्वसमावेशक क्रीडा सुविधा उभारण्याचा आमचा संकल्प आहे. या कॉम्प्लेक्समुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू अहिल्यानगरमधून घडतील,” असे जगताप यांनी नमूद केले.

कॉम्प्लेक्समध्ये कोणत्या सुविधा तयार?

राज्य सरकारच्या निधीतून वाडिया पार्कच्या धर्तीवर उभारलेल्या या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये खालील सुविधा उपलब्ध असणार आहेत.

बॅडमिंटन हॉल,टेबल टेनिस कोर्ट,मल्टिपर्पज गेम हॉल,रिफील शूटिंग रेंज,बॉक्सिंग रिंग हॉल,टेनिस कोर्ट,व्हॉलीबॉल कोर्ट,बास्केटबॉल कोर्ट,कबड्डी कोर्ट,बॉक्स क्रिकेट कोर्ट,जॉगिंग ट्रॅक,कँटीन,पार्किंग व क्वार्टर,पब्लिक टॉयलेट,लाइटिंग सिस्टम,सेमी-कव्हर योगा हॉल,प्रेक्षकांसाठी स्टेडियमची उभारणी.

या सर्व सुविधा लवकरच नागरिकांसाठी सुरू होणार असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.

“अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून आपल्या शहरातूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील. आधुनिक सुविधा आणि प्रशिक्षक उपलब्ध करून देऊन दर्जेदार क्रीडा संस्कृती घडवण्याचा उद्देश आहे.” — आमदार संग्राम जगताप.

 

 

नवीन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!