अहिल्यानगर | प्रतिनिधी
स्व. शंकरराव घुले माथाडी कामगार पतसंस्थेच्या सभासदांना यंदा १५ टक्के लाभांश वाटप करण्यात आले असून, संस्थेच्या या उपक्रमामुळे सभासदांची दिवाळी गोड झाली आहे. पतसंस्थेच्या सभासदांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी सांगितले.
नगर येथे झालेल्या या कार्यक्रमात हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, चेअरमन रवींद्र भोसले, व्हाईस चेअरमन नवनाथ बडे, सचिव बबनराव सुसे, संचालक आदिनाथ चेके, लक्ष्मण वायभासे, रत्नाबाई आजबे, उपाध्यक्ष गोविंदराव सांगळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
अविनाश घुले म्हणाले, “पतसंस्था ही केवळ आर्थिक मदत करणारी संस्था नसून सभासदांच्या हक्कांचे रक्षण करणारी यंत्रणा आहे. सभासदांनी संस्था मजबूत ठेवण्यासाठी एकत्र राहावे. भविष्यात आणखी लाभ मिळावेत यासाठी सर्वांनी सहभाग द्यावा.”

चेअरमन रवींद्र भोसले यांनी सांगितले की, “सभासदांच्या विश्वासामुळेच संस्था सक्षम झाली आहे. संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे यंदा १५ टक्के लाभांश देणे शक्य झाले. सभासदांचे हित हेच आमचे मुख्य ध्येय असून भविष्यात अधिक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
कार्यक्रमादरम्यान पतसंस्थेच्या सर्व पात्र सभासदांना लाभांश वितरित करण्यात आला. सभासदांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले.