शिवशक्ती–भीमशक्तीचा जनआक्रोश मोर्चा; प्रचंड जनसागर, आमदार जगताप, आ.पडळकर उपस्थित

अहिल्यानगर (प्रतिनिधी) –

आज रविवार, 12 ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर शहरात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चासाठी शहरात प्रचंड जनसमुदाय जमल्याचे चित्र पाहायला मिळाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. माळीवाडा बसस्थानकाजवळून प्रारंभ झालेला हा मोर्चा शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून दिल्लीगेट परिसरात पोहोचणार असून, तिथे त्याची सांगता होणार आहे.

मोर्चात हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, आमदार संग्राम जगताप, तसेच आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित आहेत. अलीकडेच शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी अपमानास्पद वक्तव्ये झाल्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर समाजातील संतप्त भावनांना अभिव्यक्त करण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला आहे.

मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दुपारी दिल्लीगेट परिसरात प्रमुख पदाधिकारी मोर्चाला संबोधित करणार आहेत.

अलीकडेच मुकुंदनगर परिसरात झालेल्या इम्तियाज जलील यांच्या सभेत आमदार संग्राम जगताप यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला आजच्या भाषणातून आमदार जगताप काय प्रत्युत्तर देतात, तसेच आमदार पडळकर कोणते विधान करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!