Women | महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी “Black Spot” ऍप; आपत्कालीन सेवांशी त्वरित संपर्काची सुविधा

मुंबई | प्रतिनिधी |

(Women) महाराष्ट्र परिवहन विभागाने महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. “Black Spot” नावाचे नवे मोबाइल अॅप लाँच करण्यात आले असून, या अॅपच्या मदतीने प्रवासादरम्यान धोकादायक ठिकाणांबद्दल (अॅक्सिडेंट प्रोन एरिया) आगाऊ चेतावणी मिळणार आहे.

(Women) या अॅपमधून थेट पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवांशी त्वरित संपर्क साधता येणार आहे. तसेच प्रवाशांच्या लोकेशनची माहिती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेला अतिरिक्त बळ मिळणार आहे.

(Women) परिवहन विभागाकडून या अॅपचा प्रसार मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असून, लवकरच राज्यभर त्याचा वापर सुरू होणार आहे. महिला प्रवाशांसाठी हे अॅप सुरक्षित प्रवासाची हमी देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!